Mumbai news : Dr. Ajit Nawale on farmers laon waiver | Sarkarnama

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय सुकाणू समिती शांत बसणार नाही : डॉ. अजित नवले

ब्रह्मा चट्टे 
शुक्रवार, 23 जून 2017

कर्जमाफीसाठी सुरू झालेले जे आंदोलन होते, ते शेतकऱ्यांनी सुरू केलेले आहे. कोणत्याही नेत्यांनी नाही. हीच सुकाणू समितीची भूमिका आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय सुकाणू समिती शांत बसणार नाही, अशी गर्जना शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केली आहे. ते कर्जमुक्तीच्या आंदोलनासंदर्भात ''सरकारनामा''शी बोलत होते.

मुंबई : कर्जमाफीसाठी सुरू झालेले जे आंदोलन होते, ते शेतकऱ्यांनी सुरू केलेले आहे. कोणत्याही नेत्यांनी नाही. हीच सुकाणू समितीची भूमिका आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय सुकाणू समिती शांत बसणार नाही, अशी गर्जना शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केली आहे. ते कर्जमुक्तीच्या आंदोलनासंदर्भात ''सरकारनामा''शी बोलत होते.

डॉ. अजित नवले पुढे म्हणाले, सुकाणू समितीची लवकरच बैठक घेवून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. सरकारच्या रोजच्या प्रतिक्रीया आणि बैठकांच्या फार्सने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांची एक लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय आम्ही त्याच दिवशी 24 जूनच्या बैठकीतच मान्य नसल्याचे सरकारला सांगितले आहे. मंत्रीगटाची व सुकाणू समिती सदस्यांच्या झालेल्या बैठकीत शासनाचा हा प्रस्ताव अमान्य करण्यात आली आहे. सरकारने 30 जून 2016 पर्यंतच्या कर्जापैकी फक्त एक लाख रूपये माफ करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सुकाणू समितीतील सर्वच शेतकरी संघटनेने अमान्य केला आहे. त्यानंतर सुकाणू समितीने आपले आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे नवले यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, सुकाणू समितीचे म्हणणे आहे की,  30 जून 2017 पर्यंतच्या सर्वच थकीत, पुनर्गठीत किंवा नवे जुने केलेले कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करा, तीच आजही सुकाणू समितीची भूमिका आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा प्रस्ताव मान्य करत नाही, तोपर्यंत सुकाणू समिती आपले आंदोलन सुरूच ठेवेल, तोपर्यंत सरकारला कोणाशी गप्पा मारायच्या त्या मारू द्या. कोणाशी चर्चा करायची करू द्या. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत सुकाणू समिती लढतच राहील, असा निर्धार नवले यांनी व्यक्त केला आहे. सरकारला कुणासोबत चर्चा करायची हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनी सुकाणू समिती आहे. मला खात्री आहे सुकाणू समितीचे सर्व नेते कर्जमाफीच्या या लढ्यात एकत्र निर्णय घेत हा लढा यशस्वी करतील, असा विश्वासही नवले यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख