सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांचे आरक्षणाला आव्हान

सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांचे आरक्षणाला आव्हान

मुंबई : सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे खासगी सचिव रमेश मनाळे यांनी आरक्षण हे संवर्गाच्या पदसंख्येस लावावे. रिक्त होणा-या जागांवर लावू नये ही मागणी घेऊन `मॅट'कडे धाव घेतली आहे. त्यामुळे मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या आधिका-यांमध्ये खळबळ माजली आहे. मंत्र्याच्याच खासगी सचिवाने आरक्षणाला आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंत्रालयात उपसचिव संवर्गातील एकूण मंजूर पदसंख्या १०५ आहे. प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेली २३ पदे आहेत. त्यानुसार उपसचिव संवर्गात १२८ पदे विचारात घेऊन आरक्षण निश्चित करून दिलेले आहे. मात्र बिंदूनियमावलीमध्ये रिक्त होणा-या पदावर आरक्षण नसावे. ते संवर्गाच्या पदसंख्येवर असावे, अशी मागणी मंत्रालयातील काही अधिका-यांनी कोर्टाकडे केली आहे. यावर सुनावणी करताना 'मॅट'ने १८ जुलैपर्यंत सरकारने स्टेटमेंट करावे अशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग काय भूमिका मांडतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वत्र पेटलेले लोन आता मंत्रालयातील अधिका-यांच्या स्तरावर आले आहे. त्यातच सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांनीही या प्रकरणात उडी घेतल्याने मंत्रालयातील इतर उपसचिव दर्जाच्या अधिका-यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com