Mumbai news - CM Fadanvis-Girish Mahajan | Sarkarnama

गिरीश महाजनांवर मुख्यमंत्री नाराज

तुषार खरात 
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई : तीन दिवसांपूर्वी लासलगाव (नाशिक) दौ-यामध्ये शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. या प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यथित झाले आहेत. जलसंपदामंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या दुर्लक्षपणामुळेच नाशिकमधील जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे महाजन यांच्यावर नाराज असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

महिनाभरापूर्वी अमित शाह यांनी सुद्धा गिरीष महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. नाशिकमध्ये शेतकरी आंदोलन पेटले असताना पालकमंत्री म्हणून गिरीष महाजन यांनी काय केले असा सवाल त्यावेळी शाह यांनी केला
होता. शेतक-यांची नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे. लक्ष देता यत नसेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय आहे, अशी तंबी त्यावेळी शाह यांनी दिली होती.

अशातच आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या दौ-यातही लासलगावच्या शेतक-यांनी जाहीर घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी ज्या रस्त्याने प्रवास केला तो रस्ता दुध आणि गोमुत्राने शुचिर्भूत करण्यात आला. नेवाळे गावातील शेतक-यांनी उस्फूर्तपणे बंद पाळला. या घटनेमुळे मुख्यमंत्री
व्यथित झाले आहेत. शेतक-यांमधील नाराजी दूर करण्याचे काम गिरीष महाजन यांचे आहे. शेतक-यांमध्ये रोष असल्याचाही अंदाज महाजन यांनी घेतला नाही.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाजन यांच्याकडे झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख