Mumbai news Chitra Wagh will meet railway official on the issue of women safety | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर रेल्वेच्या महाव्यस्थापकांना भेटणार : चित्रा वाघ 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

ऐन दिवाळीत नालासोपारा, विक्रोळी, कुर्ला, मुंबई या ठिकाणी महिलांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का, हा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. या संदर्भात आज आम्ही मुंबई पोलिस आयुक्त पडसलगीकर यांची भेट घेतली असून उद्या संध्याकाळी पाच वाजता रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहोत आणि महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नाचा पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली. या वेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते क्‍लाइड क्रास्टो, संजय तटकरे आदी उपस्थित होते. 

मुंबई : ऐन दिवाळीत नालासोपारा, विक्रोळी, कुर्ला, मुंबई या ठिकाणी महिलांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का, हा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. या संदर्भात आज आम्ही मुंबई पोलिस आयुक्त पडसलगीकर यांची भेट घेतली असून उद्या संध्याकाळी पाच वाजता रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहोत आणि महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नाचा पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली. या वेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते क्‍लाइड क्रास्टो, संजय तटकरे आदी उपस्थित होते. 

नुकतीच कुर्ल्याला झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिस अधिकारी पावरा यांनी पीडितेला चुकीचे मार्गदर्शन केले आणि तक्रार न करण्याचा सल्ला दिला. खरे तर या प्रकरणी आरोपीला कडक शासन होणे व पॉक्‍सो लागणे गरजेचे होते. पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे त्याला जमीन मंजूर आला. या प्रकरणी आम्ही आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकारी पावरा आणि कोपर्डे यांची बदली करण्यात आली असून, मुलुंड पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार हांडे यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

मुंबई ते करी रोड प्रवासात महिला असुरक्षित आहेत. महिला डब्यात प्रवास करताना पुरुष प्रवाशाने धमकावल्यामुळे उडी मारल्याने ज्या मुलीच्या डोक्‍याला आणि कमरेला मार लागला, याला जबाबदार कोण? सार्वजनिक वाहतूक धोक्‍यात आहे. आपत्कालीन साखळी खेचली; पण गंज लागल्याने साखळी खेचली गेली नाही. पॅनिक बटनबाबतही फारशी चांगली परिस्थिती नाही. सरकार दरवर्षी नवीन हेल्पलाइन क्रमांकाची घोषणा करते, पण या हेल्पलाइन क्रमांकाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे, या सर्व बाबींना जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रसंगात महिला आयोगाने पीडितेच्या पाठीशी उभे राहायला हवे. पण हा आयोग आपल्या कामापासून पळत असून तो मुख्यमंत्रांची पाठराखण महिला आयोग करत आहे. 

रेल्वे स्थानकांवरील फ्री वाय-फायचा उपयोग काही समाजकंटकांकडून अश्‍लील चित्रफिती पाहण्यासाठी होत असून या गोष्टींमुळेच राज्यातील महिला याच्या शिकार होत आहेत. परळ चेंगराचेंगरी घटनेच्या दिवशीच पुलाच्या डागडुजीसाठी निधी मंजूर होऊनही अजूनही काम सुरू झालेले नाही, या गोष्टींकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. 

या व्यतिरिक्त, तृतीयपंथीयांचे प्रश्न याबाबत वाघ यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. तृतीयपंथीयांनी केलेल्या तक्रारींची पोलिसांनकडून दखल घेतली जात नाही. या त्रासाला कंटाळून एका तृतीयपंथीयाने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. याबाबतही पाठपुरावा करणार असल्याचे त्यानी सांगितले.  
 

संबंधित लेख