Mumbai-narayan-rane-party | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

नारायण राणेंच्या पक्षात येण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पुढारी इच्छूक

तुषार खरात
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नारायण राणे यांनी स्थापन केलेला नवा पक्ष आता बाळसे धरू लागला आहे. पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगानेच राणे यांच्या या पक्षात येण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही जण प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

मुंबई : नारायण राणे यांनी स्थापन केलेला नवा पक्ष आता बाळसे धरू लागला आहे. पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगानेच राणे यांच्या या पक्षात येण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही जण प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

शिवसेनेतील जयस्वाल नावाच्या एका पुढाऱयाने राणे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे या सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेनेची युती होण्याची कोणतीही शक्यता नाही. 

राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अगोदरच भाजप प्रणीत `राष्ट्रीय लोकशाही आघाडी`मध्ये सहभागी झालेला आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करून राणे यांचा नवा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत उतरेल. त्यावेळी राणे यांच्या पक्षासाठी भाजपकडून काही जागा सोडल्या जातील. भाजपसोबत युती झाल्याने या जागांवर यश मिळण्याच्या आशा आहेत. 

भविष्यातील ही गणिते लक्षात घेऊनच शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेते पक्ष प्रवेशासाठी इच्छूक असल्याचे पक्षातील सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.  

संबंधित लेख