mumbai-narayan-rane-cm-meet | Sarkarnama

नारायण राणे उद्या भूमिका जाहीर करणार

गोविंद तुपे
शुक्रवार, 9 मार्च 2018

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र भेटीत काय चर्चा झाली, हे राणेंनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधानमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र भेटीत काय चर्चा झाली, हे राणेंनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

उद्या (शनिवारी) मुख्यमंत्र्यासोबत एक बैठक होणार आहे. आणि त्यानंतरच भूमिका जाहीर करू, अशी माहिती नारायण राणे यांनी `सरकारनामा'शी बोलतान दिली. 

राज्यातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर राणेंना उमेदवारीची ऑफर भाजपने दिली होती. त्यावर राणेंनी विचार करून निर्णय घेण्याची भूमिका भाजप नेत्यांसमोर घेतली होती. राणे कोकणातून थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विधानभवनात आले होते. 

मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांची मुख्यमंत्र्यासोबत बैठकही झाली. मात्र बैठकीबाबतची माहिती उद्याच देवू. उद्या  मुख्यमंत्र्यासोबत महत्त्वाची बैठक असल्याचे राणे यांनी `सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

संबंधित लेख