Mumbai Municipal corporation : shivsena sympathiser officers targeted by BJP | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

शिवसेनेच्या जवळचे पालिका अधिकारी भाजपच्या रडारवर 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जून 2017

 मुंबई महापालिकेत 1 लाख 20 हजार कर्मचारी आहेत. कोकण कनेक्शन आणि मूळच् मुंबईकर अधिकारी शिवसेनेला अधिकचे जवळचे असतात. असे सेनेशी सलगी असणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकारी जाणिवपुर्वक टारगेट करत आहेत. इतके काही घडत असताना शिवसेनेच्या गोटातून मात्र काहीच उपाय योजना केल्या जात नसल्याने अधिकारी  दोन्ही पक्षांतील संघर्षात मध्यममार्ग स्विकारत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या सेना भाजपच्या संघर्षात आता अधिकाऱ्यांना वेठिस धरले जात आहे. शिवसेनेचे महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावणाऱ्या अधिका-यांना भाजप नगरसेवकांकडून टार्गेट करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मुंबई महापालिकेत 24 उपायुक्त आणि 30 सहाय्यक आयुक्त आहेत. 100 पेक्षा अधिक खाते प्रमुख असून चार अतिरिक्त आयुक्त आहेत. नेहमीच मुंबई महापालिकेचे आयुक्त हे मुख्यमंत्र्यांचे खास मर्जीतील असतात. त्याचप्रमाणे महापालिकेचे सध्याचे आयुक्त अजोय मेहता मुख्यमंत्री फडणवीसांचे खास आहेत. मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची  सत्ता असून भाजपा रखवालदाराच्या भूमिकेत आहे. 

केवळ दोन नगर सेवकाचे संख्याबळ कमी असलेल्या भाजपच्या मदतीशिवाय सेनेचे काहीही चालत नाही. त्यात आता भाजपने शिवसेनेच्या बाजूने जे अधिकारी - खाते प्रमुख आहेत. त्यांनाच टारगेट करणे सुरू केले आहे. महासभेत प्रश्न उपस्थित करणे, स्थाई समितीत चौकशीची मागणी करणे, आयुक्ताकडे लेखी तक्रार करणे, आदी मागणी अधिकाऱ्यांना भाजपाकडून हैराण करणे सुरू आहे. 

मुंबई महापालिकेचे वार्षीक बजेट 36 हजार कोटींचे आहे. रस्ते, कचरा डेपो, कंत्राटे यामध्ये महापालिकेच्या अनागोंदी कारभार सातत्याने चव्हाट्यावर येत असतो. त्यामध्ये यापुर्वी विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना टारगेट करत असे. परंतु भाजपने आपली रणनिती बदलली असून अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

 

संबंधित लेख