Mumbai Municipal corporation -Narayan Rane effect | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मुंबई पालिकेत  राणे समर्थक नगरसेवक सस्पेन्समध्ये !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

महापालिकेतील बलाबल 
अपक्षांसह शिवसेनेचे सदस्य  :   88 
अपक्षांसह भाजपचे सदस्य   :  84 

मुंबई    : नारायण राणे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश न केल्यामुळे मुंबईतील राणेसमर्थक नगरसेवक गोंधळात पडले आहेत. राणे भाजपमध्ये गेल्यास त्यांच्याबरोबर पक्ष सोडण्याच्या निर्णयापर्यंत हे सहा नगरसेवक पोचले असल्याचे समजते. मात्र राणेंनी अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचे जाहीर केले नसल्याने यामुळे महापालिकेत  शिवसेना "सेफ झोन'मध्ये आली आहे. 

नारायण राणे यांच्याबरोबर कॉंग्रेसचा त्याग करण्यासाठी मुंबईतील सहा नगरसेवक तयार होते. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर या नगरसेवकांनीही राजीनामा दिला असता. भाजपच्या मदतीने पोटनिवडणूक जिंकणे या नगरसेवकांना अवघड नव्हते. राणेंच्या साथीने भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पक्षात चांगले पद मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. आता हे नगरसेवक बुचकळ्यात पडले आहेत. 

राणेसमर्थक नगरसेवक तूर्तास कॉंग्रेस सोडत नसल्याने शिवसेना 'सेफ झोन'मध्ये आली आहे. भाजपकडे शिवसेनेपेक्षा अवघे चार नगरसेवक कमी आहेत. हे सहा नगरसेवक पोटनिवडणुकीत निवडून आले असते, तर भाजपने मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून लावली असती. 

अपक्ष जिंकून येणे अवघड 
राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता स्वत:चा पक्ष स्थापन केल्यास या नगरसेवकांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पदाचा राजीनामा देणे अवघड जाईल. स्वत:ची ताकद असली, तरी इतर पक्षांशी लढून अपक्ष म्हणून निवडून येण्याची त्यांना खात्री नाही. 

 

संबंधित लेख