mumbai muncipal corruption, jayant patil | Sarkarnama

पहारेकऱ्यांनी मुंबई महापालिकेची चौकशी केली का ? : जयंत पाटील 

ब्रह्मा चट्टे 
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी आरोप करत महापालिकेच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. त्यापैकी किती आरोपांची चौकशी केली ? आपण पहारेकरी आहात अजून मुंबई महापालिकेवर केलेल्या आरोपांची चौकशी झाली आहे का याचा खुलासा व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. 

मुंबई व इतर महापालिकांच्या समस्येवर विरोधकांनी नियम 293 अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. पाटील म्हणाले, "" मुंबई हगाणदारी मुक्त झाली असल्याचे ट्‌वीट मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या ट्विट्टवर मुख्यमंत्र्यांना एका अभिनेत्रीनी सुनावले आहे. मुंबईच्या प्रश्नावर सामान्य मुंबईकरही विचारत आहेत. मागे मुंबईच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांच्यावर अशीष शेलार व किरीट सोमय्या यांनी महापालिका निवडणुकीत टीका केली होती. शिवछत्रपतीच्या स्मारकाचे भूमिपुजनला मुंबईत पंतप्रधान आले होते. त्यावेळी 1 लाख 60 हजार कोटीच्या मुंबईच्या पायाभुत सुविधांच्या विकास कामांचे भूमीपुजन झाले. त्यावेळी स्टेजवर बसायची संधी मिळेल का ? प्रधानमंत्री हस्तादोलनकरतील का ? असे प्रश्न विचारले गेले असल्याची आठवण काढून देत शिवसेना भाजपला चिमटे काढले. 

त्यावेळी भाजप आमदार मनीषा म्हात्रे म्हणाल्या, " तुम्ही भांडण लावू नका. आम्ही एकच आहोत. तुम्ही मुद्द्यांवर बोला. त्यावर जयंत पाटील यांनी मी मुद्द्यावरच बोलत असल्याचे सांगत कामाच्या घोषणा झाल्या पण काम सुरू झाले का असा सवाल केला ? त्याचबरोबर मेट्रोकार शेड, समृद्धी महामार्ग आदी मुद्द्यावरून पाटील यांनी शिवसेना भाजपला चांगलेच चिमटे काढले. 
 
संबंधित लेख