mumbai mns news | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मुलाखतीसाठी राजस्थानी, गुजराती, मारवाडी, जैन यांनीच अर्ज करावा ! 

सुचिता रहाटे 
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई : केवळ राजस्थानी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजातील मुला-मुलींचे नोकरीसाठी अज मागविता मग मराठी मुलांना का डावलता ? असा सवाल करीत मनसेने आपला हिसका दाखविताच लोअर परळ येथील कृष्णा ग्रुप कंपनीला अक्षरश: माघार घ्यावी लागली.

या कंपनीकडून चार्टर्ड अकाऊंटंट/फायनान्स मॅनेजर पदासाठी मुलाखती घेण्यात येणार होत्या. पण, या पदासाठी केवळ राजस्थानी, गुजराती, मारवाडी आणि जैन यांनीच अर्ज करावा अशी अट कंपनीचे एचआर व्यवस्थापक धिरेश पुजारी यांनी घातली होती. मनसेने मात्र यावर आक्रमक पवित्रा घेत कंपनी कार्यालयावर मोर्चा काढला आणि अशाप्रकारची अट मागे घेण्याची मागणी केली. 

महाराष्ट्रात राहून मराठी माणसांना डावलले जात आहे, मनसे हे कदापि सहन करणार नाही. त्यामुळे कृष्णा ग्रुप कंपनीचे मॅनेजर शैलेश ठाकूर यांना माफी मागून यापुढे अशा प्रकारचा कोणताही प्रकार होणार नाही असे लेखी आश्वासन द्यावे लागले. 

हात जोडून कंपनीला समज दिली आहे, पुन्हा अशा गोष्टी घडल्यास हात सोडून 'मनसे स्टाइलने' समज दिली जाईल. महाराष्ट्रातल्या कोणत्याही खाजगी कंपनीने जातीचे राजकारण करत नोकरी देण्याचे ठरविले तर मनसे आपल्या स्टाइलने आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. 

मुंबई ही मराठी माणसांची आहे. येथे मराठी माणसांनाच प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यासाठी मनसे नेहमी आग्रही असेल. गुजराती-मारवाडी यांची मिजास मनसे खपवून घेणार नाही. बाकीच्यांचे माहीत नाही, पण मनसे कधीही मराठीपणा सोडणार नाही, असेही देशपांडे यांनी शिवसेनेला टोमणा मारत सांगितले. 

संबंधित लेख