mumbai mayor lal diva | Sarkarnama

लाल दिवा उतरवा!

sarkarnama
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई : केंद्र सरकारने लोकप्रतिनिधींच्या गाडीवर दिवे लावण्यास मनाई केली असली; तरी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर लाल दिवा उतरवत काढत नसल्याने राज्याच्या परिवहन विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत केंद्राचे परिपत्रक पाहून निर्णय घेऊ, असे महाडेश्‍वर यांनी सांगितले.

ैमहापौरांच्या गाडीवर लाल दिवा न वापरण्याचे आदेश 2013 मध्ये देण्यात आले होते. तरीही महाडेश्‍वर लाल दिवा वापरत होते. 1 मे 2017 पासून सर्वच मंत्री, सनदी अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा दिवा वापरण्यास केंद्र सरकारने मनाई केली. मात्र, महाडेश्‍वर यांच्या गाडीवर आजही लाल दिवा आहे. त्यामुळे वरळी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेला नोटिस पाठवून हा दिवा काढण्याचे निर्देश दिले. 

गाडीवर दिवा वापरण्याची परवानगी असलेल्यांच्या यादीत महापौर नसल्याने दिवा तत्काळ काढावा, असे पत्र पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवण्यात आले आहे. त्यानुसार महापौर कार्यालयाला सूचना करण्यात आल्याचे पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 केंद्र सरकारचे परीपत्रक पाहून निर्णय घेऊ असे महापौरांनी सांगितले. महापौर सध्या 19 लाख 91 हजारांची इनोवा क्रिस्टा ही गाडी वापरतात. मात्र तिची किंमत पालिकेने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याने लेखापाल विभागानेही आक्षेप घेतला होता. तरीही गाडी खरेदी करण्यात आली.  

संबंधित लेख