mumbai-maratha-reservation-dhananjay-munde | Sarkarnama

मराठ्यांचे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न : धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

गुजरातमध्ये पटेलांचे आंदोलन ज्या प्रकारे हाणून पाडले, त्याच धर्तीवर मराठा आंदोलनही फोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

मुंबई : गुजरातमध्ये पटेलांचे आंदोलन ज्या प्रकारे हाणून पाडले, त्याच धर्तीवर मराठा आंदोलनही फोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने महाराष्ट्र अस्थिर झालेला असताना मुख्यमंत्री मात्र राजकीय हेतूनेच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत राज्यातील चिंताजनक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

शेतकरी आंदोलनात सरकारने ज्याप्रकारे फूट पाडली, त्याच धर्तीवर मराठा आंदोलनातही फूट पाडण्याची खेळी सरकार करत आहे.

मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयकांची बैठक घेऊन संपूर्ण समाजाला हुसकावण्याचा प्रकार होत असल्याची टीका मुंडे यांनी केली. दरम्यान, राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा अहवाल तातडीने सादर करण्याची विनंती राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली.

 

संबंधित लेख