mumbai-mallikarjun-kharge-rahul-gandhi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राहुल पंतप्रधान व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा : मल्लिकार्जून खर्गे

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

राज्यात समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत कॉंग्रेस सकारात्मक असून "राष्ट्रवादी'सह, बसप, शेकाप, भारिप बहुजन महासंघ, रिपाइं कवाडे, रिपाइं गवई, डावे पक्ष व इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. "राष्ट्रवादी'कडून 50-50 टक्‍क्‍यांचा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. आघाडी सन्मानपूर्वकच केली जाईल. 
- अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष 

मुंबई : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत ही देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे व आम्ही सर्वजण मिळून त्यासाठीच प्रयत्न करत आहोत. भाजपच्या धर्मांध विचारधारेचा पराभव करून पुन्हा कॉंग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला.
 
टिळक भवन येथे राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची आज बैठक खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये निवडणूकपूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले की, पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची मते ऐकून घेतली. समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबत चर्चा झाली असून, सन्मानजनक आघाडी व्हावी, अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करून कॉंग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 

संबंधित लेख