mumbai-girish-bapat-opposition-teasing | Sarkarnama

गिरीश बापटांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, ही विरोधकांची इच्छा!

तुषार खरात
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मुंबई : `बापट साहेब तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष व्हा आणि नानांना (विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे) मंत्रीपद द्या. नाहीतर भावी सूनबाईंना आमदार बनवा, आणि तुम्ही मात्र खासदार व्हा` असा सल्ला काँग्रेस व राष्ट्रवादीतील विरोधी पक्षांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांना दिला आहे.

गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांनी मुंबईत एक बैठक घेतली होती. आपल्या मुलाच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी बापट यांनी यावेळी सर्व विरोधकांना गाठले. 

अजितदादा पवार, राधाकृष्ण विखे - पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील असे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. 

बापट तिथे आल्यानंतर विरोधकांसोबत चांगल्याच गप्पा रंगल्या. थट्ट-मस्करी करीत विरोधकांनी बापटांची फिरकी घेण्याची यावेळी संधी साधली.

बापट साहेबांनी आता खासदारकीला प्रयत्न करून दिल्लीला जायला हवे, असा कुणीतरी सल्ला दिला.  

बापट यांच्या भावी सूनबाई जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आहेत. त्या राजकारणातही सक्रीय असल्याचे विरोधकांनी बापट यांच्या लक्षात आणून दिले. सूनबाईंना आमदार बनवा, असेही बापटांना यावेळी विरोधकांनी सुचविले.    
 
संबंधित लेख