mumbai-dhanjay-munde-CM | Sarkarnama

धनंजय मुंडेंची गर्जना... मुख्यमंत्र्यांचे काऊंटडाऊन होणारच! 

ब्रह्मा चट्टे
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

मुंबई : `नाऊ यूवर काऊंटडाऊन बिगीन्स' म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे मुख्यमंत्र्यांवर तुटून पडले. 

विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. 

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून विरोधकांनी अधिवेशनाआधीच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

धनंजय मुंडे म्हणाले, "सरकारने घोषणा केल्यानंतरही महापुरुषांच्या स्मारकाचे काम अजूनही सुरू झाले नाही. मराठा, धनगर, मुस्लिम या समाजाला अद्यापही आरक्षण मिळाले नाही. मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले मात्र सरकार कारवाई करत नाही. मंत्री रावल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना ही क्लिनचिट दिली. बोंड आळी मदत मिळाली नाही. ती घोषणाही फसवी आहे. हमीभावाबाबतीत सरकार काही भूमिका घेत नाही. चार वर्षे निर्णय का घेतला नाही. आज बांधावरचा शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करत आहे. एकही शेतकरी ऐतिहासिक कर्जमाफीचा लाभार्थी सापडला नाही. म्हणून कर्जमाफी फसवी आहे. याबाबतीत मुख्यमंत्री सत्य काय आहे ते सांगणार का?''

विधानसभा निवडणुकीत यांनी घोषणा दिली होती, की शिवछत्रपतींचा आशिर्वाद, चला देऊ मोदींना साथ. मात्र या शिवजयंतीला सरकारने एक साधी जाहीरात छापली नाही. मँगनेटीक महाराष्ट्राचे मोठी जाहिरात होती. शिवाजी महाराज यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती बाबत अपशब्द वापरला जातो तेव्हा शिवसेनेतील लोक, भाजपचे लोक, मुख्यमंत्री माफी मगत नाही, सत्तेची मस्ती चढली असल्याचा गंभिर आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, "मँगनेटीक महाराष्ट्राच्या माध्यमातून ३६ लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम करू असे मुख्यमंत्री म्हणाले. सेवा नियोजन कार्यालयातून  माहिती मिळते की सध्या राज्यात ३६ लाख तरुण बेरोजगार आहे. याचा अर्थ सरकार वर्षभरात बेरोजगारी थांबणार का ? सरकारचे हेही आश्वासन फसवे आहे. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी हे सगळे सुरू आहे. ३-४ हजार पोलीस भर्ती आली आहे. आबांच्या काळात १४-१५ हजार संख्या होती. स्पर्धा परिक्षा वेळेवर घेतल्या जात नाही. १ लाख ७० हजारचा पुरवणी मागण्याचा रेकॉर्ड या सरकारने केला असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

संबंधित लेख