mumbai dabewale mns | Sarkarnama

मनसे आंदोलनानंतर डबेवाल्यांना फटका 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वे पूल चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मनसेने काढलेल्या मोर्चानंतर रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्याविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली असून त्याचा फटका डबेवाल्यांना बसला आहे. 

मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वे पूल चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मनसेने काढलेल्या मोर्चानंतर रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्याविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली असून त्याचा फटका डबेवाल्यांना बसला आहे. 

एल्फिन्स्टन दुर्घटना घडली. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी राज यांनी प्रशासनाला इशारा दिला होता की, रेल्वे स्टेशन परिसरातुन फेरीवाले हटवले नाही तर मनसे कार्यकर्ते स्व:त ते हटवतील. त्याचा परिणाम रेल्वे प्रशासनावर झाला आणि रेल्वे परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्यात कारवाई सुरू झाली. मात्र त्याचा अप्रत्यक्ष फटका मुंबईतील डबेवाले यांना बसला आहे. 

डबेवाला घराघरातून जेवणाचे डबे सायकलच्या सहाय्याने जमा करून जवळच्या रेल्वे स्टेशनला येतात आणि त्याठिकाणी डब्यांची आदलाबदली करून पुढील प्रवास तो लोकलने करतात. हे गेले अनेक वर्षे डबेवाले यांच्या कामाचा भाग झालेला आहे. 

असे तो कित्येक वर्षा पासुन करत आला आहे. परंतु मनसेचा मोर्चा झाल्यापासुन रेल्वे प्रशासनाने डबेवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. रेल्वे परिसरांमध्ये डब्यांची सायकल आली की त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्यांना थेट कोर्टापुढे उभे केले जात असून त्यांना दंड भरवा लागत आहे. मुंबई जेवण डबे वहातुक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी कारवाई थांबवावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडे निवेदन दिले आहे . 

डबेवाले काही फेरीवाले नाहीत. ना कोणता माल ते विकतात. मग डबेवाल्यांवर कारवाई का केली जाते, असा प्रश्न तळेकर यांनी उपस्थित केला आहे. फेरीवाल्यामध्ये उत्तरभारतीय भाषिकांची संख्या अधिक आहे. मनसेच्या आंदोलनामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करावी लागत असल्याने मराठी भाषिक डबेवाले यांच्यावर वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे अशी डबेवाल्यांची प्रतिक्रिया आहे. 

संबंधित लेख