मुंबईतील खड्डयांच्या बळींची जबाबदारी महापालिकेचीच : चंद्रकांत पाटील 

मुंबईतील खड्डयामुळे अपघात झाल्याची घटना दुर्दैवी आहे. खड्डयामुळे अपघात झाले असतील तर ती जबाबदारी तेथील सत्ताधाऱ्यांची आहे. त्यामुळे ज्यांची सत्ता त्यांनी चिंता करावी. -चंद्रकांत पाटील
Chandrakant-patil-mumbai.
Chandrakant-patil-mumbai.

सांगली  : " मुंबईतील खड्डयामुळे पाच जणांचा अपघाती दुर्दैवी बळींची जबाबदारी तेथील सत्ताधाऱ्यांची आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे ज्यांची सत्ता त्यांनीच ती चिंता करून त्यावर उपाययोजना केली पाहिजे ,"अशी  प्रतिक्रिया महसूलमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

श्री. पाटील म्हणाले," मुंबईतील खड्डयामुळे अपघात झाल्याची घटना दुर्दैवी आहे. खड्डयामुळे अपघात झाले असतील तर ती जबाबदारी तेथील सत्ताधाऱ्यांची आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे तेथे निधी देण्यात अडचणी येतात. खड्डयांची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहेत. त्यामुळे ज्यांची सत्ता त्यांनी चिंता करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही रस्ते तेथे आहेत. ते चांगले बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जरुर त्यासाठी निधी देऊ. मोठ्या पावसामुळे डांबरी रस्ते उखडले जातात. त्यासाठी नविन केमिकलचा वापर केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकामकडून सिमेंट, कॉंक्रीटचे रस्ते बनवले जात आहेत.'' 

खड्डयामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देणार काय? या प्रश्‍नावर ते म्हणाले, "अपघाताची सविस्तर माहिती माझ्यापर्यंत आली नाही. मुंबईतील रस्त्यावरून लाखो वाहनधारक ये-जा करत असतात. पाचजणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्यू नेमका खड्डयांमुळे झाला आहे काय? याची चौकशी करून नुकसान भरपाईबाबत योग्य तो निर्णय घेऊ. नैसर्गिक आपत्तीनंतर रस्ते उखडल्यानंतर तत्काळ दुरूस्ती केली पाहिजे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com