Mumbai BJP politics Shetty, Somaiyya , thakur , purohit and Satam in danger zone! | Sarkarnama

मुंबईत मंत्री विद्या ठाकूर , किरीट सोमय्या, शेट्टी व  राज पुरोहित डेंजर झोन मध्ये !  

समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई     : मुंबईतील भाजपचे तीन आमदार आणि दोन खासदार सध्या डेंजर झोनमध्ये असल्याचे समजते . पक्षातर्फे करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात मतदारसंघातील खराब कामगिरीमुळे राज्यात भाजपचे काही खासदार आणि आमदार डेंजर झोनमध्ये असल्याचे निष्पन्न झालेले आहे . 

मुंबई     : मुंबईतील भाजपचे तीन आमदार आणि दोन खासदार सध्या डेंजर झोनमध्ये असल्याचे समजते . पक्षातर्फे करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात मतदारसंघातील खराब कामगिरीमुळे राज्यात भाजपचे काही खासदार आणि आमदार डेंजर झोनमध्ये असल्याचे निष्पन्न झालेले आहे . 

या खासदार आणि आमदारांनी मतदारसंघात आणि पक्षकार्यात आपली कामगिरी उंचावली नाही तर त्यांना पुन्हा विजय मिळणे अवघड असल्याचे मानले जाते . भाजपतर्फे अशा खासदार आमदारांना वेळीच सावध करून कामला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत . तर त्याचवेळी अशा आमदार आणि खासदारांना पक्षांतर्गत आणि प्रसंगी अन्य पक्षातून कोणाला पर्याय म्हणून उभे करता येईल याचीही चाचपणी आणि बोलणी सुरु असल्याचे समजते . काही आमदार - खासदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी असून त्यांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते असे समजते . 

भाजपने राज्यातील सर्व आमदार खासदारांच्या कामाचा आढावा घेतला आहे.त्यात राज्यातील 30 आमदार आणि 11 खासदार डेंजर झोन मध्ये अडकले आहेत.त्यात मुंबईतील तीन आमदारांचा समावेश आहे.

यात अंधेरी पश्‍चिम येथील आमदार अमित साटम यांचा नाव सर्वात पुढे आहे.त्यांच्या कार्यपध्दतीवर मुख्यमंत्री नाराज असतानाच फेरीवाल्यांना माराहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला.त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी अधिकच वाढली आहे.

त्यानंतर राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा क्रमांक आहे.मंत्रीपद असूनही त्या फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत.विद्या ठाकूर फक्त त्यांच्या मतदार संघापुरत्याच मर्यादित राहील्या. त्यामुळे त्यांच्याविषयी पक्षांतर्गतदेखील नाराजी आहे .   

अशीच अवस्था  कुलाब्याती राज पुरोहीत यांची आहे.राज पुरोहीत फक्त गुजराती भाषिक समाजा पुरतेच मर्यादित राहीले आहेत.  त्यांचा प्रभाव ओसरू लागला आहे . 

थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयालाचा आव्हान देणारे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे नाव अडचणीतील लोकप्रतिनिधींमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा  आहे  .

 दत्तक तत्वावर घेतलेली मैदाने पालिकेला परत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.मात्र,त्याला शेट्टी यांनी खो घातला.शेट्टी यांनी त्यांच्या संस्थांच्या ताब्यातील मैदाने उद्याने हवी असतील त्यावर केलेला खर्च परत देण्याची मागणी पालिकेकडे केली होती.शेट्टी यांचा विरोध झाल्याने सर्वच मैदाने आणि उद्याने पालिकेला परत घेता आली नाहीत.  

तर,ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या आजही फक्त भ्रष्टाचाराचे आरोप करतात.त्यांचे काम फक्त मुलूंड पुरतं मर्यादित राहिल्याने त्यांची खुर्चीही डळमळीत झाली आहे. मुंबईतील भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पक्षातील काही मोठे नेते सोमय्यांवर नाराज आहेत असे समजते . त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात सिनिऑरिटी असूनही त्यांना स्थान मिळू  शकले नाही याकडे एका गटाकडून लक्ष्य वेधले जात आहे . 

राज पुरोहीत यांना कुलाबा मतदारसंघा ऐवेजी अन्य कुठे उभे करता येईल याची चाचपणी सध्या सुरु आहे .  कुलाब्यातून विधानसभेची निवडणुक लढविण्यासाठी भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे . हा चेहेरा  पक्षातीलच असेल की बाहेरचा असेल याबाबत उत्सुकता आहे .

शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले   विधान परिषदेतील  विद्यमान आमदार राहूल नार्वेकर यांच्यावर भाजपने लक्ष केंद्रित केलेलं आहे . विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल  भाजपमध्ये घेऊन कुलाब्यातून उमेदवारी देण्याचे डावपेच भाजपतर्फे लढविले जात असल्याचे समजते . पुरोहित यांनी वेळीच हातपाय हलवले नाहीत तर त्यांना डेंजर झोनमधून बाहेर पडणे अवघड होणार आहे .   

संबंधित लेख