mumbai-ats-arrested-three-hidutvavadi-activist | Sarkarnama

हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना अटक; घातपात टळला 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तीन सदस्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज अटक केली. 

मुंबई : राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या तीन सदस्यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज अटक केली. 

वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर अशी त्यांची नावे आहेत. राऊत आणि कळसकरला मुंबईनजीकच्या नालासोपारा येथून; तर गोंधळेकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

एटीएसच्या पथकाने राऊतच्या घरी टाकलेल्या छाप्यादरम्यान कमी तीव्रतेचे 20 गावठी बॉंब, जिलेटीनच्या दोन काड्या, 22 नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर्स, विषाच्या दोन बाटल्यांसह बॉंब बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली. तिघांनाही शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर येथे बॉंबस्फोट घडवून त्यांचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 
 

संबंधित लेख