mumbai-atal-bihari-vajpayee-madhav-bhandari | Sarkarnama

अटलबिहारी वाजपेयी यांची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल : माधव भंडारी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 19 ऑगस्ट 2018

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. त्यांची तुलना करायची झाली तर नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले. 

मुंबई  : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. त्यांची तुलना करायची झाली तर नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले. 

मुंबई येथे आज भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता अभियान आणि राजहंस प्रकाशन यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात भंडारी बोलत होते. यावेळी आमदार अशिष शेलार, पोखरण चाचणीत महत्वाची भूमिका बजावणारे सुरेश हावरे, लेखक सारंग दर्शने, भाजप नेते मधु चव्हाण, ऑर्कीडचे विठ्ठल कामत उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले, "अटलजींचा सहवास ज्यांना लाभले ते भाग्यवान आहेत. देशातील सगळी महानगरांना रस्त्यांनी जोडल्यामुळे देशातील गाव महानगरांना जोडली. यामुळे देशाचा वेगवान विकास झाला. जगभरात विखूरलेल्या भारतीयांना एकजूट करण्याचे काम सगळ्यात जास्त अटलजींनी केले. त्यांच्यामुळे अनिवाशी भारतीयांनी भारतात गुंतवणूक केली. अटलजींचे देशाच्या विकासातील योगदानाविषयी चर्चा करायची झाली. तुलना करायची झाली तर ती केवळ नेहरू व इंदिरा गांधींशीच करावे लागणार आहे. अटलजींना देशाच्या अण्वीक विकासामध्ये मध्ये मोलाचे योगदान दिल्यानेच अमेरिकासारख्या देशाला भारताबरोबर अनु करार करावा लागला.''

आमदार मधू चव्हाण म्हणाले, "पुराणकाळात श्रीकृष्णाला पूर्ण पुरूष म्हटले जायचे. छत्रपती शिवरायांना पूर्ण पुरूष म्हटले जायचे. त्यानंतर अटलजींना पूर्ण पुरूष म्हणावे लागले. 1 मताने सरकार पडले पण अटलजींनी मुल्यांना सोडले नाही. मत विकत घेणे शक्य होते पण अटलजींने ते केले नाही." 
 

संबंधित लेख