mumbai-ashok-chavan-manohar-bhide | Sarkarnama

भिडे यांना कधीपर्यंत संरक्षण देणार? : अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

"मुंबईत वीस बॉंब सापडल्याप्रकरणी पोलिसांनी शिव प्रतिष्ठानशी संबंधित लोकांना अटक केली आहे. सरकारने या कट्टरतावादी संघटनांच्या कारवायांकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली,'' अशी टीका करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनोहर भिडे यांना कधीपर्यंत संरक्षण देणार, असा सवाल केला. 

मुंबई : "मुंबईत वीस बॉंब सापडल्याप्रकरणी पोलिसांनी शिव प्रतिष्ठानशी संबंधित लोकांना अटक केली आहे. सरकारने या कट्टरतावादी संघटनांच्या कारवायांकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली,'' अशी टीका करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनोहर भिडे यांना कधीपर्यंत संरक्षण देणार, असा सवाल केला. 

चव्हाण म्हणाले, "राज्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याचा कट्टरवादी संघटनांचा कट होता हे उघड झाले आहे. मनोहर भिडे यांच्या शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्तेसुद्धा या कटात सामील आहेत, हे दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईने उघड झाले आहे. शिव प्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांचा समाजविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. शिव प्रतिष्ठानचे मनोहर भिडे हे भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सूत्रधार व अनेक समाजविघातक कृत्ये आणि दंगलीतील आरोपी आहेत. पण सरकार जाणीवपूर्क भिडेंच्या कृत्यावर पांघरून घालून भिडेंना संरक्षण देत आहे.''  
 

संबंधित लेख