शिवसेनेचे कांदिवलीतील पदाधिकारी सचिन सावंत यांचा एसआरएच्या वादातून खून?

कांदिवलीतील शिवसेनेचे पदाधिकारी सचिन सावंत यांचा एसआरए प्रकल्पावरून काही जणांशी वाद होता. त्यातून त्यांचा खून झाला असावा, असे बोलले जाते; मात्र त्यास पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
शिवसेनेचे कांदिवलीतील पदाधिकारी सचिन सावंत यांचा एसआरएच्या वादातून खून?

मुंबई : कांदिवलीतील शिवसेनेचे पदाधिकारी सचिन सावंत यांचा एसआरए प्रकल्पावरून काही जणांशी वाद होता. त्यातून त्यांचा खून झाला असावा, असे बोलले जाते; मात्र त्यास पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. 

सावंत यांच्या खूनप्रकरणी पोलिसांना घटनास्थळावरील सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे एका हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्याला अटक करण्यासाठी कुरार पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने मोहीम हाती घेतली आहे. 

कांदिवलीतील दुर्गा नगरमध्ये राहणारे सावंत शिवसेना शाखा क्रमांक 39 चे उपशाखाप्रमुख होते. रविवारी (ता.22) रात्री ते मित्र प्रगनाथ वर्मासोबत मोटरसायकलने जात होते. त्यांच्या वाहनास ओव्हरटेक करून जाणाऱ्या मोटरसायकलवरील एक जण त्यांच्याजवळ आला. त्याने चेहरा झाकला होता. काही कळायच्या आत त्याने सावंत यांच्या छातीत गोळी झाडली. 

सावंत यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. सावंत यांच्यावर नऊ एमएमच्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आल्याचे समजते. या गोळीबारात अन्य एक जण जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर इजा झाली आहे.

आठ वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला
सावंत यांच्यावर आठ वर्षांपूर्वीही हल्ला झाला होता. त्या प्रकरणातील गुन्हेगार फरारीच आहेत. या गुन्ह्यांतील आरोपी एकच आहे, या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com