बुलडाणा लोकसभेसाठी कॉंग्रेसजनांची वासनिकांनाच पसंती !

बुलडाणा लोकसभेसाठी कॉंग्रेसजनांची वासनिकांनाच पसंती !

बुलडाणा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विदर्भातील मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी मुंबईत झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत बुलडाणा मतदारसंघावर चर्चा झाली. यामध्ये पुन्हा एकदा अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला. याशिवाय अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष आमदार राहूल बोंद्रे, ऍड. गणेशराव पाटील, श्‍याम उमाळकर, महिला म्हणून ऍड. जयश्रीताई शेळके यांचीही नावे पुढे आलीत. 

लोकसभा निवडणूक जवळ येत असताना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी मुंबईत जिल्हानिहाय बैठका सुरू आहेत. यामध्ये बुलडाणा मतदारसंघावर चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. 

जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्ह्यातील कॉंग्रेसची परिस्थिती व लोकसभेच्या दृष्टीने असलेली तयारी याबाबत माहिती दिली. जिल्हा कॉंग्रेस कमिटी व विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असे ठराव झाले आहेत. वासनिकांसाठी सर्व कार्यकर्ते व नेतेमंडळी तन मन धनाने एकत्रित प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. वरिष्ठांनी याशिवाय अन्य नावांवर चर्चा करताना अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, ऍड. गणेशराव पाटील, ज्येष्ठ नेते श्‍यामबाबू उमाळकर, महिला उमेदवार देण्याचे ठरल्यास ऍड. जयश्रीताई शेळके यांच्या नावावर विचारविनिमय करण्यात आला. 

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी व तयारी सुरू केली आहे. सद्य:स्थितीत राजकीय परिस्थिती सत्ताधाऱ्यांना अनुकुल नसल्याचे दिसत असल्याने कॉंग्रेस नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाने विविध उपक्रम व आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा ढवळून काढल्याने लोकसभेच्या पूर्वतयारीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. 
तरच कॉंग्रेस पर्याय 
लोकसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस ही जागा लढवेल असे बोलले जात आहे. यासाठी डॉ. शिंगणेंच्या नावाची चर्चादेखील आहे. मात्र ऐनवेळी जागा वाटपात बदल झाला आणि कॉंग्रेसला लढण्याची वेळ आली तर ऐनवेळी धावपळ नको या उद्देशाने ही पूर्वतयारी करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com