mukul wasnik and congress | Sarkarnama

मुकुल वासनिक यांची बुलडाणा व रामटेकमध्येही लोकसभेसाठी चाचपणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील राजकारणात सक्रिय झाले आहे. बुलडाणा की रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबत त्यांची चाचपणी सुरू आहे. 

नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील राजकारणात सक्रिय झाले आहे. बुलडाणा की रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबत त्यांची चाचपणी सुरू आहे. 

मुकुल वासनिकांची राजकीय कारकिर्द बुलडाणा लोकसभा मतदारसंघातूनच सुरू झाली होती. 1984 मध्ये ते बुलडाणा (अनुसूचित जातीसाठी राखीव) मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांचा लोकसभेत प्रवेश झाला होता. यानंतर पुन्हा दोनवेळा याच मतदारसंघातून निवडून आले होते. 2009 मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघातून विजय संपादन केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागल्याने पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक बुलडाणा की रामटेक येथून लढवायची, असा पेच त्यांच्या पुढे आहे. 

या दोन्ही मतदारसंघात त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. अधिक काळ दिल्लीत थांबणारे वासनिक गेल्या काही दिवसांपासून विदर्भात आहेत. काही दिवस त्यांनी बुलडाणा येथेही थांबून त्यांनी कॉंग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. तेथील कार्यकर्त्यांशी चर्चाही केली. त्यामुळे ते पुन्हा बुलडाण्याच्या राजकारणात सक्रिय होणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

गेल्या चार वर्षांपासून रामटेकपासून दूर राहणारे मुकुल वासनिक यांनी पुन्हा रामटेकमध्ये दौरे सुरू केले आहेत. पेट्रोल दरवाढ, भारत बंद व राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या विरोधात कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात मुकुल वासनिक यांनी हजेरी लावली होती. यामुळे आता वासनिक कोणता मतदारसंघ निवडतील, याविषयी आता कार्यकर्त्यांमध्येच चर्चा सुरू झाली आहे. नागपुरातील वासनिकांच्या जवळचे कार्यकर्ते मात्र रामटेकमधून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 
 

संबंधित लेख