mukta tilak birthday | Sarkarnama

पुण्याच्या महापौर : मुक्ता टिळक

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुण्याच्या महापौर असलेल्या मुक्ता टिळक 2002 पासून सलगपणे नगरसेवक आहेत. सासरची राजकीय पार्श्‍वभूमी पूर्णपणे कॉंग्रेसची. मात्र 2002 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर आतापर्यंत सलगपणे महापालिकेत काम करीत आहेत. त्याआधी पक्षाच्या महिला आघाडीचे काम केले.

महापालिकेत अडीच वर्षे भाजपाच्या गटनेत्या म्हणून जबाबदारी सांभाळली. महापालिकेत स्थायी समिती, शहर सुधारणा समितीवर सदस्य. प्रदेश महिला आघाडी, प्रदेश भाजपात विविध पदांवर काम. राष्ट्रीय मुस्लीम मंचच्यावतीने पुण्यात घेण्यात आलेल्या मुस्लीम महिलांच्या राष्ट्रीय अधिवेशनात सक्रिय सहभाग होता. "जेंडर बजेट'ची कल्पना मांडून प्रत्यक्ष अंमलबजावणी तसेच महापालिकेच्या शाळातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना देशात सर्वप्रथम राबविली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख