जलपुजनासाठी टिळक आणि चाकणकर यांच्यात चढाओढ

 जलपुजनासाठी टिळक आणि चाकणकर यांच्यात चढाओढ

पुणे : राजकारणी त्यातही सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांची मंडळी कशावरून राजकारण करतील ? आणि राजकीय संघर्ष सुरू ठेवतील ? याचा नेम नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातून वाहत असलेल्या "मुठाई'च्या (मुठा नदीच्या) खळखळण्याचेही राजकारण केले. मुठेत पाणी सोडल्यानंतर "तू अर्थात, "मुठाई' अशीच खळखळत राहो', असे साकडे घालत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने "मुठाई'ची ओटी भरली खरी, मात्र तिचे "फोटोसेशन' करीत आम्ही भाजपवर मात केल्याचा घाईने दावा केला. "राष्ट्रवादीने राजकारण केल्याचा प्रत्यारोप करीत, महापौर मुक्‍ता टिळक यांच्यासह भाजपच्या नगरसेविकांनीही "मुठाई'चे ओटी भरण केले. त्यामुळे मुठा नदीच्या वाहण्यावरून रंगलेल्या राजकीय नाट्याची चर्चा रंगली आहे. 

काही वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्यात मुठा नदी कोरडी राहिल्याचे पुणेकरांनी पाहिले. मात्र, पावसाने ओढ दिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपूर्वी "मुठाई'ला पूर आल्याचेही दिसून आले. मुळात, पुणेकरांना पुरेल इतका पाणीसाठा धरणात असल्यावर नदीत पाणी सोडले जाते. त्यानुसार खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पावसाळ्यात मोजकेच दिवस मुठा नदी खळखळून वाहिली. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीची सत्ता असताना तेव्हाच्या महापौरांनी पहिल्यांदा "मुठाई'ची ओटी भरून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतरही हा उत्सव सुरूच राहिला. 

शहरात गेल्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्याने मुठा नदीत पाणी सोडले. ती वाहत असूनही पहिल्या दिवशी म्हणजे, सोमवारी मुठाईचे स्वागत करण्याची आठवण ना सत्ताधारी भाजप, ना विरोधी पक्ष राष्ट्रवादीला झाली. मात्र, भाजपकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, काही ना काही कारणावरून सत्ताधारी भाजपच्या कुरापती काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने दोन दिवस आधी म्हणजे मंगळवारीच मुठा नदीचे ओटी भरण केले. आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह काही महिलांनी हा कार्यक्रम आटोपला. 

"मुठा नदीच्या स्वागताची भाजप आणि महापौरांना आठवण झाली नसल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. मात्र, हा कार्यक्रम नियोजित असल्याचे सांगत, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, मंजुषा नागपुरे, सरस्वती शेडगे यांनी नदीचे पूजन केले. नागपुरे म्हणाल्या, ""नदीला पाणी आल्यानंतर दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम घेतो. काही मंडळींनी उगाचच घाई करून नदीचे पूजन केले. '' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com