Mukta tilak and rohit tilak show smartness | Sarkarnama

महापौर मुक्ता टिळक व रोहित टिळक यांची चतुराई

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे :` लोकमान्य टिळक आणि प्रसारमाध्यमे` या डॉ. दीपक टिळक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या चतुराईने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. मात्र चव्हाण यांनी चतुराई केली तरी टिळक काकी-पुतण्यांनी प्रकाशनासाठी पुस्तकाचे शेअरिंग करून वेळ मारून नेली. 

लोकमान्य टिळक यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या टिळक राष्ट्रीय सन्मानाचे वितरण आज झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इसरो) संचालक कैलासावडीवू सिवन यांना देण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

प्रकाशन करताना पुस्तकाच्या प्रती कमी पडल्या. चव्हाण यांच्या हातात एक प्रत होती. मात्र शेजारी डावीकडे रोहीत टिळक व पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक होत्या. चव्हाण यांनी हातातील एक प्रत रोहीत यांच्याकडेच दिली. त्यामुळे महापौर असलेल्या मुक्ता टिळक यांच्याकडे प्रकाशनासाठी प्रत नव्हती. प्रसंगावधान राखत रोहीत यांनी महापौर असलेल्या आपल्या काकी मुक्ता टिळक यांच्या सोबत एकत्र पुस्तक धरून प्रकाशन पार पाडले. महापौर असलेल्या मुक्ता टिळक या भाजपच्या असल्याने याला राजकीय संदर्भाने पाहात सभागृहात उपस्थितांनी हशा केला. मात्र रोहीत व महापौर मुक्ता टिळक व या काकी-पुतण्यांनी वेळ मारून नेली

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख