मुकेश अंबानी यांचा मिलिंद देवरांना पाठिंबा   

दक्षिण मुंबईशी देवरा कुटुंबाचे फार जुने नाते असल्याचे म्हटले आहे.
मुकेश अंबानी यांचा मिलिंद देवरांना पाठिंबा   

मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती असलेले रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

"मिलिंद इज द मॅन फॉर साऊथ मुंबई' अशा शब्दांत त्यांचे कौतुक करणारा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर त्यांनी टाकला असून, यामध्ये मुकेश अंबानींसह कोटक बॅंकेचे प्रमुख उदय कोटक यांचादेखील समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे समजले जाणाऱ्या मुकेश अंबानींनी कॉंग्रेसच्या उमेदवाराची पाठराखण केल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. मात्र, कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि मुंबई कॉंग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या मुरली देवरा आणि अंबानी कुटुंबांचे घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. 

मुकेश अंबानी आणि मिलिंद देवरांचेदेखील मैत्रीचे संबंध असल्याने मुकेश अंबानींनी मुरली देवरा यांचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उदय कोटक यांनीदेखील मिलिंद देवरांना पाठिंबा देत मिलिंद दक्षिण मुंबईला जाणणारा आहे. दक्षिण मुंबईशी देवरा कुटुंबाचे फार जुने नाते असल्याचे म्हटले आहे. दक्षिण मुंबईतील लहान-मोठ्या अनेक उद्योगांच्या असोसिएशननी मिलिंद देवरांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये स्टेनलेस स्टील मर्चंट असोसिएशन भुलेश्‍वर, जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशन ऑफ झवेरी बाझार, डायमंड मर्चंट फेडरेशन आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com