mubai politics : Shivsena criticises Nitesh Rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर : कायंदे 

सुचिता रहाटे 
मंगळवार, 9 मे 2017

कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर झाली आहे. त्यामुळे राणे पितापुत्र बाष्कळ विधाने करीत आहेत. त्यांच्या या विधानांकडे शिवसेना मुळीच लक्ष देत नाही. 

- मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना 

मुंबई : ""कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर झाली आहे. त्यामुळे राणे पितापुत्र बाष्कळ विधाने करीत आहेत. त्यांच्या या विधानांकडे शिवसेना मुळीच लक्ष देत नाही,'' अशी कठोर टीका शिवसेना प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी "सरकारनामा' शी बोलताना केली. 

कॉंग्रेस खासदार नीतेश राणे यांनी काल रात्री उशिरा आपल्या ट्‌विटर अकाउंटवरून शिवसेना विरोधात ट्‌विट केले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे, की "महाराष्ट्राचा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, तसा महाराष्ट्र शिवसेना मुक्तही व्हायला हवा. रोजरोजची नौटंकी तरी बंद होईल.' याच विधानावर शिवसेना प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी "राणेमुक्त कोकण' असा पलटवार केला. 

""नीतेश राणे बच्चा आहे. त्याने शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांच्या वाटेला जाऊ नये. नारायण राणे हरल्याने तसाही कोकण मुक्त झालेला आहे. त्यात कॉंग्रेसची परिस्थिती बिकट आहे. असे असताना यांची शिवसेनेच्या नादाला लागायची हिम्मत कशी होते. नेहमीच राणेकंपनी शिवसेनेच्या तोंडाला लागून तोंडघशी पडते. नारायण राणे हे आजपर्यंत कोणत्याच पक्षाशी इमानदार राहिलेले नाहीत. त्यात त्यांना यश मिळत नसल्याने त्याचं हसं त्यांनीच करून घेतले आहे. जगापासून या राणेबंधूंची नौटंकी काही लपून राहिलेली नाही,'' असेही मनीषा कायंदे यांनी सांगितले.

संबंधित लेख