"लेटलतीफ' प्रदेशाध्यक्ष; कॉंग्रेसचे कसे होणार ? 
"लेटलतीफ' प्रदेशाध्यक्ष; कॉंग्रेसचे कसे होणार ? 

"लेटलतीफ' प्रदेशाध्यक्ष; कॉंग्रेसचे कसे होणार ? 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दादरच्या टिळक भवनमधील नियोजित बैठकीला तब्बल सव्वा तास उशिराने उपस्थिती लावली. प्रदेशाध्यक्षांच्या या लेटलतिफपणाबद्दल उपस्थित कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आळविला.

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दादरच्या टिळक भवनमधील नियोजित बैठकीला तब्बल सव्वा तास उशिराने उपस्थिती लावली. प्रदेशाध्यक्षांच्या या लेटलतिफपणाबद्दल उपस्थित कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आळविला. 

राज्य कॉंग्रेस कमिटीच्या अंर्तगत असणाऱ्या नियोजन विभागाची तातडीने पुनर्रचना करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे या समितीचे प्रमुख आहेत. या समितीची बैठक 22 जून रोजी दादर टिळक भवन येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र अशोक चव्हाणच दुपारी 4.15 वाजता हजर झाले. चव्हाणांच्या समोर कोणी काही बोलले नसले तरी ते गेल्यावर मात्र त्यांच्या लेटलतिफ उपस्थितीविषयी खासगीत बोलताना कॉंग्रेसच्या मंडळींनी तोंडसुख घेतले. एकतर पक्षाची सत्ता गेली, जनाधार कमी होतोय आणि प्रदेशाध्यक्षच बैठकीला लेट येत आहेत, असा टोमणा एका पदाधिकाऱ्याने सर्वांसमोर मारला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com