MP vinayak Raut taunts opponents | Sarkarnama

निवडणुकीवेळी येणाऱ्या तुडतुड्यांकडे लक्ष देवू नका : खासदार राऊत

सरकारनामा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

.

रत्नागिरी : "  निवडणुका आल्यामुळे काही तुडतुडे येतात. परंतु त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार असेल,"  असा टोला खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांना लगावला.

पावस येथील निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.   चार कोटी 97 लाख रुपये मंजूर झालेल्या भाट्ये-पूर्णगड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे  भूमिपूजन यावेळी  झाले . 
 श्री राऊत पुढे म्हणाले,"विकास कामे ही शिवसेनाच करू शकते. साडेचार वर्षांनी येणारे विकास करू शकत नाहीत. त्यामुळे  निवडणुका आल्यामुळे काही तुडतुडे येतात. परंतु त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. "

उदय सामंत यावेळी बोलताना म्हणाले, " गेल्या निवडणुकीला आम्ही स्वामी स्वरूपानंदांच्या पावन भूमीतूनच खासदारकीच्या प्रचाराला सुरवात केली होती. त्यामुळे सेनेचा खासदार झाला. आगामी 2019 होणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा निर्धार मेळावा स्वामींच्या भूमीतून करीत असल्याने आमचाच खासदार येणार, हे निश्‍चित आहे. त्यामध्ये गोळप व पावस गटातून सर्वाधिक मते मिळतील, याची खात्री आहे . " 

 या वेळी आमदार उदय सामंत, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, संजय साळवी, तालुकाप्रमुख, प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, किरण सामंत, प्रमोद शेरे, वेदा फडके, शिल्पा सुर्वे, विनया गावडे, तुषार साळवी आदी उपस्थित होते.

 

संबंधित लेख