mp vikas mahatme about dhangar reservation | Sarkarnama

'TISS' अहवाल बाजूने असो की नसो, त्याच्याशी धनगर समाजाचा संबंध नाही!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सांगली : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल 
कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर  समाजाच्या आरक्षणाचे आश्‍वासन तातडीने पुर्ण करावे. समाजाचा अंत पाहू  नये. अन्यथा धनगर समाज संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा खासदार विकास महात्मे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे होणाऱ्या माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी खासदार महात्मे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धनगर समाजाला भाजपच आरक्षण देवू शकते असा विश्‍वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ते देण्यास विलंब होत असल्याचीही कबुली दिली.

ते म्हणाले, 'टिस'चा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र यामध्ये धनगर  आणि धनगड एक नाहीत असे म्हटल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. परंतू, अहवाल धनगर समाजाच्या बाजूने असो की नसो, त्याच्याशी धनगर समाजाचा संबंध नाही. भाजपने जाहीरनाम्यात दिलेले आरक्षण देण्याचे आश्‍वासन पुर्ण करावे. राज्य सरकारकडून केंद्राकडे तातडीने शिफारसपत्र पाठवावे. त्यासाठी पाठपुरावा
सुरु आहे. 

धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने पुढील महिन्यात बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत आरक्षणचा प्रश्‍न सुटला नाही, तर सरकारला अल्टीमटेम देणार  आणि तीव्र आंदोलन छेडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. दोन महिन्यांपुर्वी  ऑगस्ट महिन्यात संघर्ष समितीने आंदोलन केले होते. मात्र अजून आरक्षणावर निर्णय झाला नाही, असे खासदार महात्मे म्हणाले.
  
संबंधित लेख