mp a t. patil | Sarkarnama

आजचा वाढदिवस : ए. टी. नाना पाटील, भाजप, खासदार-जळगाव.

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 सप्टेंबर 2018

ए. टी. नाना पाटील ऊर्फ अशोक तापीराम पाटील जळगाव लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. ते दोन वेळा याच मतदार संघातून निवडून आले आहेत. खासदार पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरवात नगरसेवक पदापासून झाली आहे. 1990 मध्ये पारोळा नगरपालिकेत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 मध्ये ते पारोळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर सन 2001 मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत ते पारोळा नगरपालिकेचे पुन्हा नगराध्यक्ष झाले. 2005 मध्ये पारोळा बाजार समितीचे चेअरमन झाले.

ए. टी. नाना पाटील ऊर्फ अशोक तापीराम पाटील जळगाव लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. ते दोन वेळा याच मतदार संघातून निवडून आले आहेत. खासदार पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरवात नगरसेवक पदापासून झाली आहे. 1990 मध्ये पारोळा नगरपालिकेत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 मध्ये ते पारोळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर सन 2001 मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत ते पारोळा नगरपालिकेचे पुन्हा नगराध्यक्ष झाले. 2005 मध्ये पारोळा बाजार समितीचे चेअरमन झाले. सन 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. सन 2009 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्याच वेळी जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्यात आली ते विजयी झाले. त्यानंतर सन 2014 मध्ये पुन्हा ते भारतीय जनता पक्षातर्फे जळगाव लोकसभा मतदार संघातून विजयी झाले 

संबंधित लेख