MP Shivajirao Adhalrao analysis | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

रायगडात सुनील तटकरे जिंकले
देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

सत्ता जिंकली... सत्य हारलं : आढळराव 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

शिवसेनेचे शिरूरमधील खासदार शिवाजीराव आढळराव यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निकालावर केलेले हे विश्‍लेषण. त्यांची फेसबुक पोस्ट. जशीच्या तशी! 
 

""मित्रांनो आजच्या निकालांहुन एक स्पष्ट झाल की देवेंद्र फडणवीस आणि टीमने महाराष्ट्रात सत्येचा दुरुपयोग करून निवडणूक प्रकिया मॅनेज केली व जवळ जवळ सर्व निकाल भाजपच्या बाजूने लावून घेतले. 
भविष्यात फडणवीसांना मुख्यमंञी पदासाठी प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या मंञी मा. पंकजाताई मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला हादरा देऊन तिथे धनंजय मुंडेना कौल देऊन पंकजाताईंचे खच्चीकरण करत राजीनामा देईपर्यंत वेळ आणली व आपला भविष्यातला प्रतिस्पर्धी आजच चितपट केला. 
खरंच सत्ता काय करेल याचा नेम नाही आणि फडणवीसांनी सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग करत सत्ता आणली. 
ज्या फडणवीसांना पुण्याची सभा गर्दी अभावी रद्द करावी लागली तेथे 96 जागांवर भाजपला बहुमत मिळाले हे कितपत विश्वास ठेवण्यालायक आहे..? 
ज्या मुंबईत मराठी माणूस शिवसेना सोडून मतदान करत नाही तिथे शिवसेनेच्या बाजूने वातावरण असताना भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागा घेतल्या हे ही कितपत योग्य आहे..? 
व ज्या नाशकात कालपर्यंत शिवसेना जास्त जागा घेईल असे जनमत होते.. तिथे भाजपला 67 जागा हे तरी पटतय का..? 
तसेच अकोला-अमरावतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत हेही मान्य न होण्यासारखेच आहे. 
हे सर्व फक्त सत्तेचा दुरुपयोग करून झालय हे जनतेने लक्षात घ्याव. 
या निकालातून एक लक्षात आलं की इथून पुढे निवडणूक लढताना जनतेची कामे नाही केली तरी चालेल पण निवडणूक प्रक्रिया जो मॅनेज करेल तोच निवडून येईल..!! 
शेवटी काय तर.. सत्ता जिंकली, सत्य हारलं'' 

संबंधित लेख