खा. शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी  मुख्य वनसंरक्षकावर फेकली राख  

डॉ. शिंदे आणि शिवसैनिकांचा संतापाची दखल घेऊन राजेंद्र कदम यांनी बदलापूरचे आरएफओ चंद्रकांत शेळके यांना तातडीने निलंबित केले असून उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जीतेंद्र रामगावकर यांची आठवडाभरात चौकशी करून शासनाला अहवाल पाठवण्याचे मान्य केले. त्याबाबतचे लेखी पत्रच कदम यांनी दिले आहे.
Shivsena-Thane-.
Shivsena-Thane-.

ठाणे :  लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्‍यातील मांगरुळ येथे लावलेली एक लाख झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक होत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाण्यातील कोपरी येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. जळालेली झाडे आणि राखेची भेट मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्या टेबलावर फेकून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

डॉ. शिंदे आणि शिवसैनिकांचा संतापाची दखल घेऊन राजेंद्र कदम यांनी बदलापूरचे आरएफओ चंद्रकांत शेळके यांना तातडीने निलंबित केले असून उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जीतेंद्र रामगावकर यांची आठवडाभरात चौकशी करून शासनाला अहवाल पाठवण्याचे मान्य केले. त्याबाबतचे लेखी पत्रच कदम यांनी दिले आहे.

 तसेच, जिल्ह्यातील वृक्षारोपण अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचेही त्यांनी मान्य केले असून मांगरुळ येथे झाडांना आग लावणाऱ्या समाजकंटकांविरोधात वन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचेही मान्य केले आहे.

 आंदोलनानंतर खासदार डॉ. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राख फेकण्याचा प्रकार घडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेऊन पाच जुलै 2017 रोजी अंबरनाथ तालुक्‍यातील श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या 80 एकर जागेवर लोकसहभागातून एकाच दिवसात एक लाख झाडे लावण्याचे अभियान राबवले होते. तब्बल 15 हजारहून अधिक लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत अवघ्या काही तासांत एक लाख झाडे लावली होती.

 या झाडांचे संगोपन उत्तम प्रकारे व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी स्वखर्चाने येथे पाण्याच्या टाक्‍या आणि पाइपलाइनची सोय करून दिली होती. तसेच, गेल्या वर्षी माणसे नेमून गवतही कापले होते. या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागाने घ्यावी, तेथे वेळोवेळी गवत कापावे, संरक्षक भिंत बांधावी, वनविभागाची चौकी बांधून कायमस्वरुपी सुरक्षरक्षक नेमावा, यासाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते.

 ही सर्व कामे करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्य वनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी सातत्याने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी कुठलीही पावले उचलली नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही खा. डॉ. शिंदे यांनी या मुद्द्यांकडे अनेकदा लक्ष वेधले होते.

वनविभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी आणि गेल्या आठवड्यात पुन्हा 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी समाजकंटकांनी ही झाडे जाळल्याचा प्रकार घडला. गेल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या आगीत तर 70 टक्‍क्‍य्ांहून अधिक झाडे जळाली आहेत.

 मात्र, त्यानंतरही वनविभागाने हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतलेला नसून समाजकंटकांना अटक व्हावी, यासाठी कोणतीही पावले उचलेली नाहीत, तसेच बेजबाबदारीने वागलेल्या वन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई देखील केली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

झाडे मोठी होऊन जंगल झाले तर वीटभट्टीसाठी माती मिळणार नाही, जागेवर अतिक्रमण करता येणार नाही. म्हणूनच वन अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकार केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सरकार झाडे लावण्यासाठीच्या इव्हेंटवर आणि त्यांच्या प्रसिद्धीवर जितका खर्च करते, तो खर्च झाडे जगवण्यावर केला असता तर आतापर्यंत महाराष्ट्र हिरवागार झाला असता, अशी टीका देखील यावेळी खा. डॉ. शिंदे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com