mp sharad bansode on state govt | Sarkarnama

सोलापूरचे भाजप खासदार "नाना पटोले मूड'मध्ये ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सोलापूर : केंद्र सरकारच्या बाबतीत एवढ्या तक्रारी नाहीत. मात्र, राज्य सरकारबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. त्यातल्या त्यात कर्जमाफीवरून लोकांमध्ये नाराजी असल्याचे जाणवत असल्याचे मत खासदार शरद बनसोडे यांनी व्यक्त केले. 

सोलापूर : केंद्र सरकारच्या बाबतीत एवढ्या तक्रारी नाहीत. मात्र, राज्य सरकारबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. त्यातल्या त्यात कर्जमाफीवरून लोकांमध्ये नाराजी असल्याचे जाणवत असल्याचे मत खासदार शरद बनसोडे यांनी व्यक्त केले. 

बनसोडे यांनी "सकाळ' कार्यालयात संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. खासदार बनसोडे म्हणाले, केंद्राच्या योजनांची फळे लोकांना हळूहळू दिसायला चालू होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात देशाची प्रतिमा उंचावली आहे. तरुण सोशल मीडिया एन्जॉय करतोय. मागील तीन वर्षांमध्ये सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जनता व मंत्री यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणारा लाल दिवा पंतप्रधानांनी काढून टाकला आहे. नव्या सरकारने आम्हाला स्वाभिमानाची शिकवण दिली आहे. स्वच्छतेची सवय लोकांना लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार सर्वकाही करत आहे. सरकार गरिबांसाठी समर्पित आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही अशाच होत्या. त्यावेळीही आपल्या देशाची प्रतिमा चांगली होती. मला खात्री आहे की भारत निश्‍चितच महासत्ता बनेल, असा विश्‍वासही खासदार बनसोडे यांनी व्यक्त केला. 

राज्यघटना हा आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. घटनेला छेद देण्याचे कोणतेही काम आमचे सरकार करत नाही. सोलापूर येथे आयटी पार्क व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. बोरामणी विमानतळ चालू झाल्यानंतर होटगी विमानतळाची जागा त्यासाठी वापरता येईल. स्मार्ट सिटीमध्ये एरिया बेस डेव्हलपमेंट होत आहे. आताचा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर घेतला आहे. एखादे शहर चांगले दिसायचे असेल तर त्याचे एन्ट्री पॉइंट चांगले असायला हवेत. रेल्वे स्टेशन, एसटी स्थानकाचा परिसर चांगला असणे आवश्‍यक आहे. स्मार्ट सिटीमध्ये तो होईल. त्याचबरोबर स्मार्ट सिटीत हिप्परगा तलावाची संकल्पना चांगली आहे. त्याठिकाणी चांगले पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. 
 

संबंधित लेख