mp sanjay kakade snubs girish bapat | Sarkarnama

बापट यांची बदनामी करणाऱ्या तूरडाळीला खासदार काकडे यांचा तडका 

महेंद्र बडदे
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

पुणे : अब्रुनुकसानीचे अनेक दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे नबाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या अशा दाव्यात काही तथ्य नसल्याचे खुद्द बापट यांच्याच लक्षात आले असावे. त्यामुळेच त्यांनी दावा मागे घेतला असावा, अशी कोपरखळी भाजपचे खासदार संजय काकडे यांनी मारली आहे. 

सातत्याने चर्चेत असणारे खासदार संजय काकडे हे आता येवलेवाडीच्या वादग्रस्त विकास आराखड्याच्या आखाड्यात उतरले आहे. या प्रश्नासंदर्भात आयोजित पत्रकार परीषदेत पत्रकारांनी बापट यांनी दाखल केलेल्या आणि नंतर मागे घेतलेल्या अब्रु नुकसानीच्या दाव्यावर प्रतिक्रिया विचारली. तेव्हा हसत हसत काकडे यांनी बापट यांच्या तूरडाळीला तडका दिला. 

तूरडाळीच्या खरेदी आणि विक्रीत काही हजार कोटी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. त्याविरुद्ध बापट यांनी मलिक यांच्याविरुद्ध अब्रु नुकसानीचचा दावा दाखल केला होता. हा दावा न्यायालयाच्या बाहेर मिटविला गेला आणि बापट यांनी हा दावा मागे घेतला. 

याबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर काकडे म्हणाले, "" कोणताही आरोप होतो तो त्या सरकारवर असतो. परंतु, संबंधित खात्याचा मंत्री म्हणून ती जबाबदारी मंत्र्यावर येते. असे अब्रुनुकसानीचे दावे न्यायालयात पडून राहतात. त्यावर काहीच होत नाही, त्यामुळे हा दावा पडून राहू नये, या दाव्यात तथ्य नाही असे बापट यांना वाटले असावे म्हणून त्यांनी तो मागे घेतला असावा''.  
 
संबंधित लेख