mp sanjay kakade about medha kulkarni | Sarkarnama

#MarathaReservation मेधा कुलकर्णी 'तसे' बोलल्या असतील तर मी माफी मागतो: काकडे

उमेश घोंगडे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

आरक्षण लवकरात लवकर जाहीर व्हावे, आंदोलनादरम्यान गेल्या महिनाभरात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन यावेळी खासदार काकडे यांना देण्यात आले. आज आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाच्याआधारे मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीन तसेच दाखल गुन्हे मागे घेण्यासाठीदेखील प्रयत्न करीन, असे खासदार काकडे यांनी सांगितले. 

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाविषयी आमदार मेधा कुलकर्णी नेमके काय बोलल्या, या विषयी मला नेमकी माहिती नाही. मात्र त्या जर काही बोलल्या असतील तर त्यांच्यावतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्यावतीने मी माफी मागतो, असे खासदार संजय काकडे यांनी आज सांगितले. 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज काकडे यांच्या कार्यालयासमारे ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिय्या आंदोलनात स्वत: सहभागी होत मी आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षण मिळावे या मागणीचा पुरस्कर्ता मी सुरवातीपासून आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावादेखील करीत आहे. आरक्षण मिळणारच आहे. त्यासाठी आत्महत्या, जाळपोळ, तोडफोड करण्याची आवश्‍यकता नाही. या मार्गाने आपल्याला आरक्षण मिळणार नाही. सरकार त्यांच्या पातळीवर काम करीत आहे. ते लवकर होण्यासाठी लोकशाही मार्गाने आपण साऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी हिंसा हा मार्ग नाही हे आपण साऱ्यांनी लक्षात घेतले. पाहिजे. 

आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी करण्यात आलेले आंदोलन व त्यादरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर काकडे बोलत होते. मराठा आंदोलनाविषयी आमदार कुलकर्णी नेमके काय बोलल्या याची मला कल्पना नाही. त्यांच्याकडून चूक झाली असेल तर त्याची माफी मागायला मला कमीपणा वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख