MP Pritam Munde rally | Sarkarnama

खासदार मुंडेंच्या नेतृत्वाखाली निघाली गोपीनाथगड - सावरगाव घाट वाहन फेरी

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथे आज गुरुवारी मेळावा आणि बाबांच्या स्मारकाचे लोकार्पण होत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह संत - महंतांची उपस्थिती असेल. 

बीड : सावरगाव येथे होत असलेल्या दसरा मेळाव्या निमित्त गोपीनाथगड ते सावरगाव घाट अशा निघालेल्या वाहन फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. फेरीचे रस्त्याने जागोजाग स्वागत झाले. 

संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव येथे आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने दुसरा दसरा मेळावा होत आहे. संत भगवान बाबांच्या स्मारकाचे लोकार्पणही होणार आहे. दरम्यान, दुपारी होत असलेल्या मेळाव्यासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वाहन फेरी निघाली आहे.

 

संबंधित लेख