mp khubba | Sarkarnama

लातुरकरांना बिदरच्या खासदारांकडून नात्याची हाक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

लातूर : मुंबई- लातूर रेल्वेगाडी बिदरपर्यंत वाढवल्यामुळे लातूर-उदगीर आणि बिदरमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर "लातूरकरांनो चिंता करू नका, हम है ना' असे म्हणत बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नेत्यांचे पुतळे जाळल्यामुळे मी दुःखी झालो आहे. लातूर- बिदरचे शेकडो वर्षांचे सांस्कृतिक नाते आहे, रेल्वे प्रश्‍नावर राजकारण न करता ते नाते जपावे असे आवाहन देखील खुब्बा यांनी पत्रकार परिषदेत केले. 

कर्नाटकातील बिदर व मराठवाड्यातील लातूर, उदगीर व नांदेड आदी भागात नागरिकांचे नातेसंबंध आहेत, ते बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भागांना जोडणाऱ्या राज्य मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून विकासकामे केली जातायेत. लातूर- बिदर रेल्वेने जोडण्यासाठीच मुंबई-बिदर रेल्वे सुरू करण्यात आल्याचा दावा खासदार खुब्बा यांनी केला आहे.

बंगळुरूची यशवंतपूर-बिदर गाडी लातूरपर्यंत धावणार असून लातूर-बिदर इंटरसिटी देखील लवकरच चालू होणार असल्याचे ते म्हणाले. लातूरची गाडी बिदरला पळवल्याचा आरोप चुकीचा आहे, खासदार 
व पालकमंत्र्यांवर कुणीही दबाव टाकलेला नाही असा खुलासा करतानाच रेल्वेचा प्रश्न हा कुणाच्या अस्मितेचा होऊ शकत नाही. त्याचे भावनिक राजकारण करणे चुकीचे असल्याचे मत खुब्बा यांनी व्यक्त केले.

काही अडचणी, गैरसमज, मतभेद असतील तर लवकरच खासदार डॉ. सुनील गायकवाड, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी चर्चा करून दूर केले जातील असे आश्‍वासन खुब्बा यांनी दिले. तसेच लातूर रेल्वे बचाव समितीला रेल रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती देखील केली. 

संबंधित लेख