mp gajanan kirtikar on modi govt | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मोदी सरकारला जनता घरी पाठवणार : गजानन किर्तीकर 

सरकारनामा ब्युराे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

वाई (सातारा): वाढत्या महागाईने सामान्य माणूस ग्रासला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा तसेच नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय भाजपच्या अंगलट आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता मोदी सरकारला घरी पाठवणार यात शंका नाही, असे मत शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क नेते, खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केले. 

वाई (सातारा): वाढत्या महागाईने सामान्य माणूस ग्रासला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा तसेच नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय भाजपच्या अंगलट आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता मोदी सरकारला घरी पाठवणार यात शंका नाही, असे मत शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क नेते, खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केले. 

वाई येथील ज्ञानश्री मंगल कार्यालयात झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शंभूराजे देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगुडे पाटील, महिला संपर्क प्रमुख युगंधरा साळेकर, महिला आघाडीच्या प्रमुख शारदाताई जाधव, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार घाडगे, डी. एम. बावळेकर उपस्थित होते. 

श्री. किर्तीकर म्हणाले, मोदींनी देशाचा विकास आणि सामान्य जनतेच्या हितापेक्षा स्वतःचे हट्ट भागविण्यातच धन्यता मानली. त्यामुळे आज संपूर्ण देशात मोदी आणि भाजपच्या विरोधात लाट आली आहे. कर्जमाफीची घोषणा केली परंतु अजून कर्जमाफी दिलेली नाही. हा सामान्य शेतकऱ्यांच्या अपमान आहे. नोटाबंदी व जीएसटीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांना पक्षाच्या खासदारांनी सामान्य लोक अंगावर येतील असे सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही. देशाचा आर्थिक कणा मोडण्याचे काम त्यांनी केले आहे. ही आर्थिक घडी बसविण्यासाठी दोन-चार वर्षे लागतील. मागील निवडणुकीत सत्तेच्या मोहापायी भाजपाने पंचवीस वर्षाची युती तोडून मैत्रीच्या पाठीत खंजीर खुपसला. परंतू शिवसेना पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढली. त्यावेळी 63 जागा मिळाल्या. हिंदूत्व आणि राष्ट्रहितासाठी राज्यात भाजपा सरकारला पाठींबा दिला. तरीही त्यांचे डावे- उजवे चालू आहे. मराठवाडा, विदर्भात शिवसेनेची घौडदोड सुरु आहे. 
 

संबंधित लेख