शरद पवार माझे परमेश्‍वर; राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतःहून कधीच सोडणार नाही!

लोकसभेतील माझे कामकाज ज्येष्ठ नेते शरद पवार दररोजच पाहतात.
शरद पवार माझे परमेश्‍वर; राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतःहून कधीच सोडणार नाही!

कोल्हापूर : मी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतःहून कधीच सोडणार नाही. कारण शरद पवार माझे परमेश्‍वर आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. 

राष्ट्रवादीच्या मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी श्री. महाडिक यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, 'ही बैठक लोकसभा उमेदवारी चाचपणीसाठी होती; पण कोणी या उमेदवारीसाठी इच्छुक आहे, असे या बैठकीत सांगितले नाही. लोकसभेतील माझे कामकाज ज्येष्ठ नेते शरद पवार दररोजच पाहतात. त्यांनी मला खूप मोठा मान दिला असल्याची जाणीव आहे. यामुळे मी याव्यतिरिक्त आणखी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही.

दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील मुख्य कार्यकर्त्यांची पवार यांनी बैठक घेतल्यानंतर त्याच दिवशी रात्री व रविवारी खासदार महाडिक यांनी श्री. पवार यांच्याशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्थानाबद्दल चर्चा केली असल्याचे समजते. 

आमदार हसन मुश्रीफ यांनी आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे संजय मंडलिक यांचे नाव परस्परच कसे जाहीर केले, येथपासून ते आर. के. पोवार यांच्या पुतण्याचा महापालिका निवडणुकीतील पराभवाचा राग ते आपल्यावर कसे काढत आहेत, इथंपर्यंतच्या सर्व गोष्टींचा पाढा महाडिक यांनी पवार यांच्यासमोर वाचला असल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com