महाडिकांचा पाटील यांना टोला : हे महाशय  तोडण्याचे काम करतात 

कॉंग्रेसच्या कोल्हापुरातून सुरु झालेल्या जनसंघर्ष यात्रेत येथील एक विद्वानांनी कोल्हापूर लोकसभेची जागा कॉंग्रेसला सोडण्याची मागणी केली.- खा.महाडिक
satej_patil_dhananjay_mahadik
satej_patil_dhananjay_mahadik

कोल्हापूर   :  " देशातील भाजप सरकारच्या विरोधात मोट बांधण्याचे काम राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार हे करत आहते. असे असताना कॉंग्रेसच्या कोल्हापुरातून सुरु झालेल्या जनसंघर्ष यात्रेत येथील एक विद्वानांनी  कोल्हापूर लोकसभेची जागा कॉंग्रेसला सोडण्याची मागणी केली. पवार साहेब सर्वांना जोडण्याचे काम करत असताना हे महाशय तोडण्याचे काम करत आहेत ," असा  टोला खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

खासदार महाडिक म्हणाले, लोकसभा जागा वाटपाचा निर्णय हा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार, कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी घेणार आहेत. कोल्हापुरची जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. असे असताना ही जागा कॉंग्रेसला मागण्यात आली आहे. हा निर्णय दिल्लीतील नेते घेणार आहेत. आपणाला तिकीट मिळणार यात काही अडचण वाटत नाही. तसेच कोल्हापुरची ही जागा कॉंग्रेसला मागण्याचा कोणताही अधिकार नाही . "

कॉंग्रेस पक्षाने कोल्हापुरातून सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेवेळी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरची ही जागा कॉंग्रेस पक्षाला देण्याची मागणी केली होती. पक्षाने ही जागा आपल्याकडे ठेवल्यास आपण ती निवडून आणू,अशी ग्वाही त्यांनी दिली होती. पक्षाचे नेते मल्लीकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आमदार पाटील यांच्यावर विश्‍वास व्यक्‍त केला होता. आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागल्याने पुन्हा एकदा कोल्हापुरच्या जागेचा वाद पेटू लागला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com