MP Dhanajay Mahadik singled out in party meet | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत खासदार महाडिक एकाकी

सदानंद पाटील
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

विद्यमान खासदार महाडिक हे पक्षविरोधी काम करतात. याबाबत त्यांनाही विचारा अशी मागणी  शहराध्यक्ष आर के पोवार, राजू लाटकर यांनी   केली असे समजते .  

कोल्हापूर :   महापालिका, नगरपालिका ,जिल्हा परिषद आदी निवडणुकात खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षविरोधी काम केले आहे . त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी  मागणी  राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे समजते .  

मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आले होते .ही बैठक खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील , प्रफुल्ल पटेल याचबरोबर राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यातून या बैठकीस आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने , धैर्यशील माने, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील , शहराध्यक्ष आर के पोवार, राजू लाटकर आदि उपस्थित होते.

शरद पवार  पवार यांच्यासमोर आणि खासदार महाडिक यांच्या उपस्थितीत ही मागणी झाल्याने सर्व नेतेमंडळी अस्वस्थ झाली.यावेळी  आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत विचारणा झाली . यावर उमेदवार कोण आहे, अशी विचारणा झाली .

विद्यमान खासदार महाडिक हे पक्षविरोधी काम करतात. याबाबत त्यांनाही विचारा अशी मागणी  शहराध्यक्ष आर के पोवार, राजू लाटकर यांनी   केली असे समजते .   प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांनी महाडिक यांच्याकडे यावेळी विचारणा केली. मात्र त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. यावर शहराध्यक्ष आर के पोवार, राजू लाटकर यांनी धनंजय महाडिक सोडून कोणीही उमेदवार द्या, अशी मागणी केली.असल्याचे वृत्त आहे . 

संबंधित लेख