mp bansode on mahadeo jankar | Sarkarnama

नामांतरप्रश्‍नी खासदार बनसोडेंचे महादेव जानकरांकडे बोट ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यासाठी धनगर आणि लिंगायत समाजात संघर्ष सुरु असताना याप्रश्‍नी खासदार शरद बनसोडे यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. स्वत: कोणतीही भूमिका न घेता मंत्री महादेव जानकर यांच्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. 

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यासाठी धनगर आणि लिंगायत समाजात संघर्ष सुरु असताना याप्रश्‍नी खासदार शरद बनसोडे यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. स्वत: कोणतीही भूमिका न घेता मंत्री महादेव जानकर यांच्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. 

गेले महिनाभर सोलापूर विद्यापिठाच्या नावावरुन वादंग सुरु आहे. विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, यासाठी धनगर समाजाने मोर्चा काढला. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून सिद्धेश्‍वरांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने केली. त्यांनीही मोठा मोर्चा काढला. या मोर्चावेळी बहुतेक नेत्यांनी मोर्चांवेळी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र खासदार बनसोडे यासंबंधाने काहीही बोलले नव्हते. 

"सकाळ' कार्यालयात संवाद साधताना ते म्हणाले की, दोन्ही समाजाने बसून तोडगा काढावा. सोलापूर विद्यापीठाला कोणते नाव द्यायचे यावरून दोन्ही समाजाने मोर्चे काढले आहेत. खरेतर त्यापूर्वीच या दोन्ही समाजांतील धुरंधर नेत्यांनी याबाबत बसून योग्य तो तोडगा काढायला हवा. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचीही भूमिका याबाबत स्पष्ट झाली नाही, असेही खासदार बनसोडे यांनी सांगितले. 

महत्त्वाची बाबी म्हणजे सहा सात वर्षापुर्वी महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली अहिल्याबाई होळकर यांचे नाव विद्यापिठाला देण्यासाठी पहिला मोर्चा काढण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या मोर्चात रासपचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. तरीही खासदार बनसोडे हे जानकरांकडे बोट दाखवितात, याविषयी आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

संबंधित लेख