MP anil shirole birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : खासदार अनिल शिरोळे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचा आज वाढदिवस. शिरोळे हे भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील ज्येष्ठ नेते आहेत. भाजप ज्या काळी पुण्यात फार शक्तिशाली नव्हता तेव्हापासून त्यांची पक्षाशी नाळ जुळली गेली आहे.

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचा आज वाढदिवस. शिरोळे हे भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील ज्येष्ठ नेते आहेत. भाजप ज्या काळी पुण्यात फार शक्तिशाली नव्हता तेव्हापासून त्यांची पक्षाशी नाळ जुळली गेली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते संसदेत गेले. शांत व संयमी राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. पुणे महापालिकेत तब्बल वीस वर्षे ते नगरसेवक होते. शहर हितासाठी स्पष्ट भूमिका घेणारे म्हणून त्यांचा लौकीक आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. पुण्यातील मेट्रो, नदीसुधार प्रकल्प हे मार्गी लागण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सर्वसामान्यांना सहज भेटणारा नेता म्हणून तसेच फिटनेससाठीची आदर्श जीवनशैली सहजपणे सांभाळणारा खासदार म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

संबंधित लेख