आजचा वाढदिवस : खासदार अनिल शिरोळे 

आजचा वाढदिवस : खासदार अनिल शिरोळे 

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचा आज वाढदिवस. भारतीय जनता पक्षाच्या महाविद्यालयीन आघाडीचे प्रमुख म्हणून शिरोळे यांनी राजकीय जीवनाला प्रारंभ केला. याच काळात खासदार शिरोळे यांचा भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी निकटचा संबंध आला. त्यानंतर मुंडे यांच्या निधनापर्यंत खासदार शिरोळे हे मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात.

स्वच्छ आणि प्रामाणिक राजकारणी ही त्यांची विशेष ओळख आहे. पुणे महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम केले. यातील तीन वेळा निवडून आले तर एकदा स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या काळात पक्षाचे गटनेते तसेच महापालिका पातळीवरील विविध समित्यांवर काम केले आहे. जुन्या बोपोडी विधानसभा तसेच शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या स्पर्धेतून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. सव्वातीन लाख इतक्‍या विक्रमी मतांनी ते निवडून आले. खासदार म्हणून काम करताना लोकसभेच्या विविध समित्यांवर ते काम करीत आहेत. पुण्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com