mp and rajsthan cm announced by congress | Sarkarnama

राजस्थानमध्ये गेहलोट; मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ : राहुल यांची पसंती निष्ठावंतांना

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी काॅंग्रेसने अशोक गेहलोत यांची निवड केली आहे. नाराज झालेल्या सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. काॅंग्रेसने आज दुपारी या नावांची घोषणा केली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी काॅंग्रेसने जुने निष्ठावंत कमलनाथ यांची निवड केली आहे. 

गेहलोत हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. राहुल यांनी तरुण नेत्यांऐवजी जुन्या नेत्यांनाच पदे देणे पसंत केले आहे. कमलानाथ हे गांधी घराण्याशी घनिष्ठ आहेत. संजय गांधी यांचे जवळचे मित्र म्हणून ते ओळखले जात होते. नंतरच्या टप्प्यात ते राजीव गांधी यांच्याही निकट गेले होते. सोनिया गांधी यांचे विश्वासू सल्लागार म्हणून त्यांची ओळख होती. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. ते राहुल यांचे मित्र म्हणून ओळखले जात. मात्र मित्रांऐवजी राहुल यांनी निष्ठावंतांना संधी दिली.

राजस्थानमध्येही पायलट यांना तरुण चेहरा संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. ते प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाला चांगले यश मिळाले. त्यामुळे पायलट यांचे समर्थक मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. ते आपल्या मागणीसाठी काल रस्त्यावर आले होते. त्यांना शांतता पाळण्याचे आवाहन गेहलोट आणि पायलट यांना करावे लागले होते.

दोन्ही राज्यांची सूत्रे कोणाकडे द्यायची, याचा पेच आता संपला अाहे. छत्तीसगडमधील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय़ होणे अद्याप बाकी आहे.

संबंधित लेख