mp anandrao adasul criticizes rav rana | Sarkarnama

मराठा आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी रवी राणांकडून आरोपसत्र : अडसूळ

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा आंदोलन तापलेले असताना त्याचा फायदा घेण्यासाठी आमदार रवी राणा यांनी एका तरुणाला माझ्याविरुद्ध फेसबुकवर काॅमेंट लिहायला लावली. त्या तरुणाने रवी राणांच्या सांगण्यावरून मी काॅमेंट केली असे लिहून दिले की मी अॅट्रोसिटीची गुन्हा मागे घेतो, असे शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांना दिल्लीत सांगितले.

अमरावतीत सध्या राण आणि अडसूळ या दोघांत वाद पेटला आहे. अॅट्राॅसिटी आणि खंडणीचे गुन्हे यावरून दाखल झाले आहेत. यावर संसद भवनात बोलताना अडसूळ यांनी याबाबतची आपली भूमिका मांडली. 

``माझ्यावर भ्रष्टाचाराचे धादांत खोटे आरोप केले आरोप केले. खोटे आरोप करून खासदाराची बदनामी केली म्हणून मी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. माझ्याविरुद्ध आंदोलन करणारा भेंडे कोण हे मी अजून पाहिलेले नाही. फेसबुकच्या माध्यमातून जर  आरोप करणार असेल तर त्यांच्याविरोधात पण अॅट्राॅसिटी होते.मराठा आंदोलन तापलेले असताना त्याचा फायदा घेण्यासाठी रवी राणा आणि त्याला कृती करायला लावली. फेसबुक वर दिलेली कमेंट रवी राणा यांच्या आदेशावरून दिलीअसं तरुणाने सांगितलं की मी लगेच पुन्हा मागे घेतो,``, असे अडसूळ यांनी सांगितले.

रवी राणा यांच्या पत्नीचे अनुसूचित जातीचे  प्रमाणपत्र हायकोर्टाने अवैध ठरवले. नवनीत यांना खासदारकीची निवडणूक लढवायची आहे. पण प्रमाणपत्र नसल्याने त्यांना ती लढवता येत नाही. त्यामुळे हे आरोप सुरू झाल्याची टीका त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख