MP adharao about Bhaiyuu maharaj | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

भय्यू महाराज म्हणाले होते की मी विधानसभेला जाणार पण पोचलो लोकसभेत! : आढळराव

भरत पचंगे
बुधवार, 13 जून 2018

शिक्रापूर :  `तुमच्या नशिबात लोकसभा नाही. तुम्ही विधानसभेत मात्र हमखास पोहचाल,` असे अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी मला सन २००३ मध्ये सांगितले होते. पण त्यांचे राजकीय भविष्य असत्य ठरले. त्यांचे भविष्य असत्य ठरले असले तरी त्यांच्या सान्निध्यात कायम सकारात्मक ऊर्जा मला मिळाली, अशी भावना शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

शिक्रापूर :  `तुमच्या नशिबात लोकसभा नाही. तुम्ही विधानसभेत मात्र हमखास पोहचाल,` असे अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी मला सन २००३ मध्ये सांगितले होते. पण त्यांचे राजकीय भविष्य असत्य ठरले. त्यांचे भविष्य असत्य ठरले असले तरी त्यांच्या सान्निध्यात कायम सकारात्मक ऊर्जा मला मिळाली, अशी भावना शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

राजकारण्याचें गुरु, राजकारण्यांना एकत्रित आणणारे, भविष्य सांगणारे म्हणून भय्यू महाराज परिचित होते.  पुणे जिल्ह्यातील एकही राजकारणी असा नाही की, ज्याचा त्यांच्याशी संवाद किंवा संपर्क नव्हता. राजकारणात सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी त्यांच्या भय्यू महाराजांच्या स्मृती जागविल्या.

ते म्हणाले की भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उभारणी करताना सामान्य शेतक-यांचा संपर्क व संवादाने मला राजकारणात उतरण्याची प्रेरणा मिळाली. समोर चालेलेल्या अनेक राजकीय घडामोडींचा मी साक्षीदार असल्याने मी  २००३ मध्ये शिवसेनेकडून लोकसभेला उभे राहण्याचा विचार करु लागलो. म्हणून मग एक दिवस आम्ही उभयता इंदूरला महाराजांना भेटायला गेलो. गेलो त्या दिवशी रात्री भय्यू महाराजांनी माझी राजकीय इच्छा ऐकून घेतली. उद्या सकाळी पुजा-मंत्रविधी झाल्यावर भेटू, असेही त्यांनी सांगितले.

दुस-या दिवशी मी मोठ्या आशेने व उत्साहाने त्यांचे घरी गेल्यावर पूजाअर्चा पूर्ण होताच माझा हातही त्यांनी पाहिला. मला सांगितले की, ’तुमच्या नशिबात लोकसभा नाही. अर्थात तुम्ही विधानसभेला निवडून याल. ते ऐकून मी  निराश झालो नाहीच. कारण माझा निर्णय मी घेतलेला होताच. पुढे शिवसेना प्रवेश झाला, असे आढळराव म्हणाले.

त्यानंतर निवडणुकीचा प्रचारही सुरू झाला. याच दरम्यान भय्यू महाराज यांचा प्रचाराच्या दरम्यानच मला फोन आला आणि ते मला म्हणाले की, तुम्ही आता निवडून तर येणारच आहात शिवाय आपण केंद्रात मंत्रीही होणार आहात.  महाराजांचा हा राजकीय दिलासा देण्याचा अनुभव मी चांगला घेतला. ते म्हणाले होते तसे आजपर्यंत तरी माझ्या बाबतीत घडलेले नाही. तरीही एक मात्र नक्की की, त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी, ऊर्जावान आणि सकारत्मकता देणारे होते. म्हणूनच त्यांचा आणि माझा संवाद आत्तापर्यंत चांगला राहिला. खूप वेळा ते माझ्या लांडेवाडी (ता.मंचर, जि.पुणे) येथील घरी, माझ्या शाळेत आवर्जून येवून गेले. मतदारसंघातही खूप वेळा भेटले, अशी आठवण आढळराव यांनी सांगितली.

संबंधित लेख